Kolhapur Accident : कोल्हापूरमधील धक्कादायक घटना, धावत्या गाडीत हॉर्ट अॅटॅक

कोल्हापूर : टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षांसह नऊ वाहनांना उडवले. या दुर्घटनेत राजारामपुरी येथील धीरज शिवाजीराव पाटील या ५५ वर्षांच्या उद्योजकाचा मृत्यू झाला. ते राजारामपुरीतील पाचव्या गल्लीत वास्तव्यास होते. कार चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि हा अपघात घडला, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केली आहे.







कोल्हापूर शहरातील टेंबलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणार्‍या उड्डाणपुलाजवळ धीरज शिवाजीराव पाटील हे त्यांच्या कारमधून जात होते. ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेंबलाई नाका, टाकाळामार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते. यावेळी अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, मोपेड, दुचाकीसह एकूण नऊ वाहनांना धडक देऊन पुढे गेली. कार पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली.





मध्यरात्र असल्याने या अपघातवेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून घाबरलेले नागरिक पटकन रस्त्यावर आले. यावेळी रस्त्यावर तुटलेल्या वाहनांचा खच पडला होता. शिवाय, एक कार पुढे कचऱ्याजवळ जाऊन थांबलेली दिसली. हे बघून नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी धीरज पाटील यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली आणि धीर पाटील यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. कोल्हापूरमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओतून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येतो.
Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई