Gold Rate Today : सर्वसामान्यांना दिलासा! सोन्याचे दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर काय?

  86

मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून याकाळात अनेकजण सोनं-चांदीची खरेदी करतात. त्याचबरोबर लगीनसराईला देखील सुरुवात झाली असून दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं चांगलंच महागात पडत होतं. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण (gold price fall) झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Gold Rate Today)



मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या किंमतीत फक्त १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यानुसार आजचे सोन्याचे भाव २४ कॅरेट १ ग्रॅम सोने हे ८९ हजार ५६७ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१ हजार ७३६ रुपये आहे. या किंमतीत ८८ रुपयांनी घट झाली आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ८९ हजार ६७० रुपये आहे. या किंमतीत ११० रुपयांनी घट झाली आहे. तर २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ८ हजार २२० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६५ हजार ७६० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ८२ हजार २०० रुपये आहे.


त्याचबरोबर १८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ६ हजार ७२६ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३ हजार ८०८ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ६७ हजार २६० रुपये आहे.



चांदीची किंमत काय?


आज चांदीची किंमत (Silver Rate Today) ८ ग्रॅम चांदीची किंमत ८२४ रुपये आहे. १० ग्रॅम चांदी १ हजार ०३० रुपयांना विकली जात आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत १० हजार ३०० रुपये आहे.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही