डोंबिवली : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा सोमवार १७ मार्च २०२५ रोजी होणार आहे. मराठी रयतेचे कल्याणकारी शासक, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ शिल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी वाहतुकीच्या नियोजनाचा निर्णय घेतला आहे.
सोहळा सुरळीत व्हावा यासाठी रविवार १६ मार्च २०२५ रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते सोमवार १७ मार्च २०२५ रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाहन चालकांनी नमूद कालावधीत घरडा सर्कल कडील प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
१. प्रवेश बंद- डोंबिवली शहरातून घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना शिवम हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदर वाहने जिमखाना रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
२. प्रवेश बंद- सुयोग रिजन्सी मार्गे घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदर वाहने कावेरी चौक, एम. आय. डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.
३. प्रवेश बंद- खंबाळपाडा रोड, ९० फीट रोड, ठाकुर्ली रोड मार्गे घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदर वाहने सावित्रीबाई फुले नाट्यगृह मार्गे इच्छित स्थळी जातील.
४. प्रवेश बंद – आजदे गाव, आजदे पाडा येथून घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदर वाहने एम. आय. डी. सी. अंतर्गत रस्त्यांनी इच्छित स्थळी जातील.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…