AR Rahman : ए. आर. रेहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मुलाने दिली माहिती!

  53

मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक एआर रहमान यांच्याबद्दल आज सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली. आज सकाळच्या सुमारास प्रसिद्ध गायक ए. आर. रेहमान (A.R. Rahman) यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने चैन्नईमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, रुग्णालयात त्यांच्यावर हृदयाशी संबंधित विशेष डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते. मात्र आता ए. आर. रेहमान यांच्या उपचारपद्धती पूर्ण झाल्या असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.



एआर रहमान यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या विविध कारणांमुळे आणि बातम्यांदरम्यान, रहमान यांचा मुलगा एआर अमीनने त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अमीनने लिहिले आहे की, त्याच्या वडिलांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. तसेच एआर रहमान यांच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे रोजा ठेवल्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. तसेच, आता ए. आर. रहमान यांच्या मुलानंही त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.



आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत - सायरा रहमान 


एआर रहमानच्या आजारपणाबाबत त्याची पत्नी सायरा रेहमान (Saira Rahman) हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये "मी सायरा रहमान बोलतेय. मी एआर रहमान लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करते. मला बातमी मिळाली की, त्यांना छातीत वेदना होत होत्या आणि त्यामुळे त्यांची अँजिओ झाली. देवाच्या कृपेनं, ते आता ठीक आहेत... मी तुम्हाला सर्वांना हे देखील सांगू इच्छिते की, आमचा अधिकृतपणे घटस्फोट झालेला नाही, आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत... माझ्या आरोग्याच्या कारणास्तव आम्हाला वेगळं व्हावं लागलं. गेल्या दोन वर्षांपासून माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी त्यांना जास्त ताण देऊ इच्छित नव्हते. कृपया, मी तुम्हाला मीडियाच्या लोकांना विनंती करते की, मला 'पूर्वाश्रमीची पत्नी' म्हणून संबोधू नका. आम्ही वेगळे आहोत एवढीच गोष्ट आहे, पण माझ्या प्रार्थना नेहमीच त्यांच्यासोबत आहेत. मी त्यांच्या (एआर रहमानच्या) कुटुंबालाही सांगू इच्छिते की, त्यांना जास्त स्ट्रेस देऊ नका आणि त्यांची काळजी घ्या.", असे सायरा रहमान म्हणाली आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या