स्कोप्जे : उत्तर मॅसेडोनिया देशातील कोकानी शहरातील पल्स नाईटक्लबमध्ये रविवारी(दि. १६) पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झालेत.
उत्तर मॅसेडोनियाच्या गृह मंत्रालयाचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर मॅसेडोनियाच्या राजधानी स्कोप्जेपासून सुमारे १०० किमी पूर्वेला असलेल्या कोकानी येथील पल्स नाईटक्लबमध्ये रविवारी(दि. १६) पहाटे प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनच्या लाईव्ह परफॉर्मन्स सुरु होता. यावेळी अचानक आग लागली. कार्यक्रमाला सुमारे १,५०० लोक उपस्थित होते.या भीषण दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नाईट क्लबमध्ये मोठी आग लागल्याचं आणि आकाशात दाट धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेतील जखमींना शहराच्या दक्षिणेस सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या कोकानी आणि स्टिप येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. नाईटक्लबमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान आतिषबाजीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…