Minister Nitesh Rane : रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई : रेडिओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आज बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते. जेट्टीबाबत स्थानिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले.



गेट वे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरिता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.



अशी असणार जेट्टी`


टर्मिनल इमारत ८० मीटर बाय ८० मीटर, ३५० लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी, अग्निसुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, गार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी भू – गर्भ चाचणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं