Virar : विरारमध्ये खळबळ! सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं; इतर अवयव गायब

  65

मुंबई : विरारमध्ये (Virar Crime)एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका सुटकेसमध्ये धड नसलेले महिलेचं मुंडकं आढळलं आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ ही घटना घडली. गुरूवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी संध्याकाळी काही तरूणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. तेथे या तरूणांना एक सुटकेस दिसली. तरुणांनी सुटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचं मुंडकं आढळलं. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर, कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. आता मुख्य आरोपी नक्की कोण आहे, याचाही पोलीस तपास घेत आहेत.
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई