Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी रोज सकाळचा शिमगा बंद करावा!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला


मुंबई : राज्यभरात होळी आणि धूलिवंदनाचा सण (Holi 2025) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वसामान्यांसह दिव्यंग तसेच अनेक राजकीय नेते देखील कुटुंबासह धुळवडीचा आनंद घेत आहेत. अशातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धुळवडीच्या शुभेच्या देत संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे.



महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देत, रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा त्यांनी बंद करावा आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता सुचना कराव्यात असा टोला लगावला. 'संजय राऊत (Sanjay Raut) रोज सकाळी ९ वाजता जो शिमगा साजरा करतात तो बंद करुन, महाराष्ट्राच्या हितासाठी सुचना कराव्यात. वर्षभर शिमगा साजरा करता. आज होळीच्या दिवशी तो शिमगा न करता मुख्यमंत्री देवेंद्रजींना, आम्हा सगळ्यांना विकासाकरिता सुचना द्याव्यात. राऊतांनी रोज सकाळी बोलावं पण, महाराष्ट्राच्या हिताकरिता यथार्थ बोलावं' असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना म्हटले.


त्याचबरोबर " उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) रोज सभागृहात यावं आणि महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराव. अडीच वर्षात त्यांनी काय काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात कधी कधी न येता रोजच सभागृहात यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं" असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ