भारताने पकडला अमेरिकेचा मोस्ट वाँटेड आरोपी

तिरुअनंतपुरम : सीबीआयने केरळ पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आणि तिरुअनंतपुरममधून अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड आरोपीला अटक केली. सध्या भारतातील कोठडीत असलेल्या या आरोपीला लवकरच अमेरिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. लिथुआनियाचा नागरिक असलेला अलेक्सज बेसीकोव आणि रशियाचा नागरिक असलेला अलेक्झांडर मिरा सर्डा या दोघांवर अमली पदार्थांच्या तस्करांना, अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांना आणि अतिरेक्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचा आरोप आहे. मागील अनेक दिवसांपासून अमेरिका बेसीकोव आणि अलेक्झांडर मिरा सर्डा या दोघांना शोधत आहे. हे आरोपी भारतात केरळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने केरळ पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. लवकरच दोन्ही आरोपींना अमेरिकेच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.



लिथुआनियाचा अलेक्सज बेसीकोव आणि रशियाचा अलेक्झांडर मिरा सर्डा हे दोघे २०१९ पासून गॅरंटेक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचा कारभार हाताळत होते. गॅरंटेक्समध्ये आतापर्यंत ९६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अलेक्सज बेसीकोव हा गॅरंटेक्सशी संबंधित तांत्रिक बाजू हाताळत होता तर अलेक्झांडर मिरा सर्डा गॅरंटेक्सचा सहसंस्थापक आणि मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून कार्यरत होता. या प्रकरणात सखोल तपासातून आणखी माहिती हाती येईल.



आर्थिक अफरातफर करण्यासाठीही गॅरंटेक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. आरोपी बेकायदा पद्धतीने विनापरवाना गॅरंटेक्स वापरत होते. गॅरंटेक्सद्वारे पैशांची एका देशातून दुसऱ्या देशात रवानगी होत होत होती. या व्यवहारांवर कर दिला नव्हता. बराच काळ सरकारकडे या व्यवहारांची ठोस माहिती पण उपलब्ध नव्हती. याचाच गैरफायदा बेकायदा व्यवहारांसाठी केला जात होता.



आरोपींना क्रिप्टोकरन्सी प्रकरणात किमान २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. काही आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि करारांचे उल्लंघन केल्याचाही ठपका आरोपींवर आहे. या प्रकरणांमध्येही दोषी आढळल्यास प्रत्येक प्रकरणासाठी आरोपींना पाच - पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. यामुळे आरोप सिद्ध झाले तर आरोपींचा प्रदीर्घ काळासाठीचा मुक्काम तुरुंगातच असेल.Most Wanted
Comments
Add Comment

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

अहमदाबाद : सध्या देशभरात कार मॉडिफिकेशनचं वारं वाहत असलं तरी गुजरातच्या एका पठ्ठ्याने मात्र कल्पकतेच्या सर्व

Sikkim Landslide : भूस्खलनात अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराचे युद्धपातळीवर प्रयत्न

- भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन हिम सेतू'ला सुरुवात भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममधील लाचेन

Gangster Atiq Ahmed : प्रयागराज हादरलं! गँगस्टर अतीक अहमदच्या ड्रायव्हरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान,

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)