Gangster Atiq Ahmed : प्रयागराज हादरलं! गँगस्टर अतीक अहमदच्या ड्रायव्हरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान, याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रयागराज मधील केली येथील बिस्मिल्लाह चौकाजवळ घडली.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, बिस्मिल्लाह चौकाजवळ इरफान चहा पित असताना हा हल्ला झाला. चेहऱ्यावर रुमाल बांधलेले चार हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून आले होते. त्यापैकी एकजण खाली उतरला आणि थेट इरफानच्या छातीत गोळी झाडली. गोळीबार होताच परिसरात घबराट पसरली आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.


घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत इरफानला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


तपासात असे समोर आले आहे की, मोहम्मद इरफान हा अतीक अहमदच्या भावाशी संबंधित होता आणि पूर्वी तो त्याच्यासोबत राहत तसेच गाडी चालवत असे. दरम्यान, या हत्येमुळे इरफानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आक्रोश करताना दिसले.



आसिफ दुर्रानी आणि त्याच्या भावावर संशय :


या प्रकरणात कुटुंबीयांनी आसिफ दुर्रानी आणि त्याच्या भावावर संशय व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, इरफान आणि आसिफ यांच्यात मालमत्तेच्या व्यवहारावरून वाद होता आणि त्यातूनच ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवणार :


पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. डीसीपी यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल.


सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू असून, कायदेशीर कारवाई वेगाने केली जात आहे.

Comments
Add Comment

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री