भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी 'ரூ' चिन्ह लावले

चेन्नई : तामीळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तामीळ विरुद्ध हिंदी हा भाषावाद आणखी तीव्र झाला आहे. तामीळनाडूत द्रमुक (इंडी आघाडी) सत्तेत आहे तर केंद्रात भाजपाच्या (एनडीए) नेतृत्वातले सरकार आहे. द्रमुक सरकारने भाषावादात स्वतःची भूमिका आणखी कठोर केली आहे. तामीळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या शुक्रवारी १४ मार्च रोजी जाहीर होणार असलेल्या २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे.



नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्राद्वारे राज्यावर हिंदी लादल्याच्या आरोप करणाऱ्या तामीळनाडूतील द्रमुक सरकारने रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तामीळनाडू हे देशातील पहिले राज्य झाले आहे जिथे रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. स्टॅलिन सरकारने अद्याप अर्थसंकल्पातील बदल या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. पण भाजपाने तामीळनाडू सरकारच्या कृतीवर टीका केली आहे. द्रमुकच्या नेतृत्वातील तामीळनाडू सरकारची कृती ही भारतापासून वेगळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली. भाषावाद निर्माण करुन द्रमुक स्वतःच्या अपयशांकडून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वेधू इच्छिते, अशीही शक्यता भाजपाने व्यक्त केली. तर तामीळ भाषेला प्राधान्य देण्यासाठी अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे, असे द्रमुकचे नेते सरवनन अन्नादुराई म्हणाले. त्यांनी तामीळनाडू सरकारच्या कृतीत काहीही बेकायदा नसल्याचा दावा केला.



तामीळनाडूत २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यात मुख्य लढत द्रमुक विरुद्ध अण्णाद्रमुक अशी आहे. पण भाजपा मागील काही काळापासून राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ताजा भाषावाद निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी