'पुढे सरका' असे सांगितल्याचा राग, वृद्ध महिलेने महिला कंडक्टरच्या हाताला घेतला चावा

जळगाव : बसमध्ये गर्दी असताना वाहकाने “पुढे सरका” असे सांगितल्याचा राग आल्याने एका वृद्ध महिलेने महिला वाहकाच्या हाताला कडाडून चावा घेत जखमी केले. हा धक्कादायक प्रकार टॉवर चौकाजवळ घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव बसस्थानकातून नरगीस खलील मनियार (३६, रा. एस.टी. कॉलनी) या महिला वाहक आणि बस चालक बापू बाबुराव कोळी हे आसोदा-जळगाव (MH 14 DT 2175) या बसने मार्गस्थ झाले. बसमध्ये गर्दी असल्याने वाहकाने प्रवाश्यांना पुढे सरकण्यास सांगितले. मात्र, ७० वर्षीय सुशीला शिरसाठ (रा. नांद्रा) या वृद्ध महिलेला हे बोलणे खटकले आणि त्यांनी अचानक महिला वाहकाला शिवीगाळ करत हुज्जत घालायला सुरुवात केली.


बसमधील एका जेष्ठ किर्तनकार महाराजांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या वृद्ध महिलेने त्यांनाही चप्पल उगारून शिवीगाळ केली संतापाच्या भरात वृद्ध महिलेने महिला वाहकाचा हात घट्ट धरून पिरघळला आणि पंज्यावर जोरदार चावा घेतला, ज्यामुळे वाहकाच्या हातातून रक्तस्राव सुरू झाला. या घटनेने बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बस चालकाने थेट बस शहर पोलिस ठाण्यात नेली. पोलिस ठाण्यात महिला वाहकाने संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सुशीला शिरसाठ यांची चौकशी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द