होळीचा रंगीबेरंगी सण साजरा करणे सर्वांनाच आवडते. आपल्यातील अनेक जण स्वतःचे सौंदर्य, व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, म्हणून हेअऱकलर करताना नव्या ट्रेण्डमधील रंग निवडतात. होळी खेळताना केसांवर गुलाल उधळला जातो. केस रूक्ष होतात. हेअरकलर करतानाही केसांचे आरोग्य बिघडते. या दोन्ही गोष्टींचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. होळी साजरी केल्यानंतर तुमचे केस नेहमीपेक्षा जास्त रूक्ष आणि कोरडे झाल्याचे दिसून येते.
holi 2025 : होळीच्या रंगामुळे केस नक्कीच खराब होतील! त्यासाठीचं ‘या’ टिप्स करा फॉलो
होळीत वापरल्या जाणा-या रंगांमध्ये ब-याचदा रसायने वापरली जातात. या रसायनांचा तुमच्या केसांशी संपर्क आल्यास नैसर्गिक तेल कमी होते, पण काळजी करू नका ! होळी साजरी करण्याची तयारी करताना केसांबाबत आवश्यक काळजी घेणे आवश्यक ठरते. होळीत केसांवर रंग लागल्यावर पुन्हा आवश्यक उपाययोजना केल्यास केसांचे आरोग्य आणि चमक टिकून राहते.
योग्य उपचार आणि सौम्य हेअरकेअर उत्पादने वापरून, तुम्ही केसांचा तजेलदारपणा परत आणू शकता आणि सणानंतरही तुमचे केस चमकदार ठेवू शकता. होळीच्या सणात सहभाग घेण्यापूर्वी केसांची काय काळजी घ्यावी, तसेच सण साजरा केल्यानंतर आवश्यक उपाययोजना आदींबाबत गोदरेज प्रोफेशनलच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर यियान्नी त्सापतोरी यांनी हेअरकेअर टिप्स शेअर केल्या आहेत.
- केसांवर तेल लावणे : होळीच्या सणात सहभाग घेण्यापूर्वी घराबाहेर निघण्याअगोदरच केसांवर भरपूर तेल लावून घ्या. तेलामुळे तुमच्या केसांवर संरक्षक थर निर्माण होईल, केसांसाठी मॅकाडामिया तेलाचा वापर करा. केराकेअर मॅकाडामिया तेल तुमच्या केसांना मऊ, सुळसुळीत आणि चमकदार बनविते.
- केशरचना सुयोग्य असावी : केसांमध्ये गुंता कमी व्हावा, तसेच रंगांशी संपर्क कमी यावा, म्हणून केसांची आंबाडा किंवा घट्ट वेणी घाला.
- केस झाका : घराबाहेर पडण्याअगोदरच केस स्कार्फ, बँड किंवा टोपीने झाकून घ्या. स्कार्फ, बँड किंवा टोपीमुळे गडद रंगांचा केसांशी थेट संपर्क येत नाही. बँड किंवा टोपी कठोर रंगांपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते.
होळीनंतर केसांची चमक आणि तजेलदारपणा मिळविण्याचे उपाय - थंड पाण्याने केस धुवा : होळीचा सण साजरा केल्यानंतर केसांत भरपूर रंग असतो. केस थंड पाण्याने धुवा. केस धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर केल्याने अतिरिक्त रंग निघून जातो. शक्यतो, सौम्य शॅम्पूचा वापर करावा.
- ड्रायर वापरू नका : केस धुतल्यावर नैसर्गिकरीत्या सुकू द्या. केसांवर ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्न वापरणे टाळा.
- चांगल्या शॅम्पूचा वापर करा : प्रोबिओ हनी मॉइश्चर शॅम्पूसारख्या मॉश्चरायझिंग घटकांनी समृद्ध असलेला शॅम्पू निवडा. या शॅम्पूच्या वापराने तुमचे केस व्यवस्थित धुतले जातील. केसांमध्ये ओलावा टिकून राहण्यासही हा शॅम्पू मदत करतो. केसांची योग्य निगा राखण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा शॅम्पू करा.
- हेअर मास्कचा वापर : शॅम्पूनंतर हेअर मास्क वापरावा. हेअर मास्क बनविण्यासाठी मधाचा वापर करा. मधात अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे तुमच्या केसांमधील ओलावा टिकवून धरतात. मधाच्या वापराने केस स्वच्छ धुतले जातात.
होळी हा विविधरंगांनी नटलेला उत्सव आहे. होळीचा सण साजरा करण्यापूर्वी आवश्यक काळजीचा अवलंब करणे जरूरीचे आहे. होळीचा सण साजरा केल्यानंतर केसांची खासकरून काळजी घ्यायला हवी. केस स्वच्छ धुतले जातील, ओलावा आणि चमक टिकून राहील, याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करावा. यियान्नी त्सापतोरी यांच्या टिप्स अंमलात आणल्यास होळीचा सण बिनधास्त साजरा करता येईल. तुमचे केस होळीत धम्माल केल्यानंतर कोणताही त्रास देणार नाही. आनंदाने रंगांची उधळण साजरी करा.