MHADA : १५ दिवसांत पैसे भरा, अन्यथा गाळे सील करणार

मुंबई  : मुंबईत सध्या खासगी विकासकांकडून पुनर्विकास सुरू असून इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. पुनर्विकास करताना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात या रहिवाशांना भाड्याने जागा दिली जाते.(MHADA) मुंबईतील १४ खासगी विकासकांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील शेकडो गाळे भाडेतत्त्वावर घेतले असून गेल्या ८ वर्षांत २९२ कोटी ३८ लाखांची थकबाकी ठेवली आहे. या विकासकांनी १५ दिवसांच्या आत पैसे भरले नाहीत तर त्यांनी भाड्याने घेतलेले गाळे सील केले जातील, असा इशारा राज्य सरकारच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला.



जुन्या चाळी, झोपडपट्ट्या, इमारती यांच्या पुनर्विकासाचा वेग वाढला आहे. पुनर्विकास करताना विकासकांकडून रहिवाशांसाठी म्हाडाची संक्रमण शिबिरे भाड्याने घेतली जातात.(MHADA) या गाळ्यांचे भाडे विकासक वर्षानुवर्षे भरत नसल्यामुळे त्यांची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. यावर विधान परिषदेत भाजपा सदस्य प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नावर माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले.


म्हाडाने १ एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२५ पर्यंत या आठ वर्षांत २७४ कोटी ३८ लाखांची वसुली केली. जानेवारी २०२५ पर्यंत थकबाकीची रक्कम १७२ कोटी ५४ लाख व त्यावरील विलंब दंड ११९ कोटी ८४ लाख असे मिळून २९२ कोटी ३८ लाख थकबाकी शिल्लक आहे. थकबाकी ठेवणाऱ्या १४ पैकी ६ विकासकांवर कारवाई करत त्यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. १२ विकासकांना थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत इतर परवानग्या देऊ नये, असे निर्देश म्हाडा व एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ