Beed Satish Bhosle (khokya) Arrested : सतीश भोसले ऊर्फ खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून ठोकल्या बेड्या

  106

बीड : बीडमधील गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड सतीश भोसले उर्फ खोक्या (Satish Bhosle (khokya) याला अखेर प्रयागराज येथे पोलीसांनी अटक केली आहे.शिरुरमध्ये एका व्यक्तीला मारहाणीच्या घटनांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सतत ठिकाणं बदलत होता. अखेर, गुप्त माहितीच्या आधारे बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.याबाबत माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.




बीडच्या शिरुरमध्ये काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेने एका तरुणाला केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता. बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.अखेर ६ दिवसांनंतर तो सापडला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे. त्यानुसार आता प्रयागराज पोलीस सतीश भोसले याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करतील.त्याला आज किंवा उद्या बीडला आणले जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.

खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर (Satish Bhosle (khokya) तीन गुन्हे दाखल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसलेने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. याशिवाय सतीश भोसले याने शिरूरमध्ये बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यानंतर खोक्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. अखेर त्याला प्रयागराजमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.