दैवं बलवत्तर म्हणून श्वानाने वाचविले रखवालदाराचे प्राण

  98

डेअरीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ


राहता : राहता येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असलेल्या सुनील शांताराम सदाफळ यांच्या पंचकृष्णा डेअरी प्रोडक्सच्या प्रांगणात बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश करून डेअरीच्या लॅबमध्ये जोरदार भांडणातून लॅब साहित्यांचे मोठे नुकसान केले.


यापूर्वी गेटजवळ राखण करणाऱ्या राखणदारावर बिबट्याने हल्ला करण्यापूर्वीच भयभीत झालेल्या श्वानाने रखवालदाराजवळ भुंकत जाऊन त्यास जागे केले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रसंगातून रखवालदाराचे प्राण या श्वानाने वाचवले. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता येथील १५ चारी परिसरात तसेच जवळपासच्या परिसरात बिबट्यांचा मोठा वावर वाढतोय. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, जनावरे व कुत्रे यांचा फरशा बिबट्यांनी केल्याच्या घटना घडत आहेत. काल पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन बिबट्याने पंचकृष्णा डेअरी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. गेटवर असलेला रखवालदार झोपेत असल्याने त्याच्याकडे जाणाऱ्या बिबट्यास पाहून तेथे असलेल्या कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली.



त्यामुळे रखवालदारास जाग आली. बिबट्यास पाहून भयभीत रखवालदाराने यास हाकलण्यास प्रयत्न केला. बिबट्याने यावेळी जवळच असलेल्या लॅबमध्ये प्रवेश केला. दरवाजा बंद झाल्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने आतमध्ये दूध चेक करण्याच्या अनेक लॅब साहित्याचे मोठे नुकसान केली. बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्यामुळे कार्यालयाच्या जाड काचेला धडक देत काच फोडून बिबट्या बाहेर पळाला. जवळच असलेल्या शेतामध्ये बिबट्या फरार झाला. बिबट्याचा हा थरथराट पाहण्यासाठी आजूबाजूच्या अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दत्तात्रय सदाफळ यांनी ही बातमी सुनील सदाफळ यांना फोनवर कळवून घटनास्थळी बोलावून घेतले.


या प्रकारानंतर चितळी रोड व १५ चारी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मोठा वावर असून या परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत आहेत. शासनाने व वन विभागाने या परिसरात आजच्या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन त्वरित सर्व भागात पिंजरे लावून मोकाट वावरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व भयभीत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे. - सुनील सदाफळ, पंचकृष्ण डेअरी मालक, राहाता

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ