Suryagrahan 2025 : लवकरच लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! 'या' राशीतील लोकांना घ्यावी लागणार काळजी

मुंबई : हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहांच्या हालचालींवर आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही १२ राशींच्या लोकांवर परिणाम करतात. त्यामुळे या काळात काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे असते. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या काही दिवसांत वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Suryagrahan 2025) आणि चंद्रग्रहण होणार आहे. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नसले तरीही याचा प्रभाव काही राशींवर (Zodic Signs) चांगला तर काही राशींवर वाईट पडणार आहे.



वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहण हे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तारीख म्हणजेच २९ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजून २१ मिनिट ते सायंकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत असणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण मीन राशी आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होणार आहे. या दिवशी मीन राशीत अनेक मोठे ग्रह असणार आहे. या दिवशी मीन राशीत सूर्य आणि राहू व्यतिरिक्त, शुक्र, बुध आणि चंद्र देखील लग्नाच्या घरात असणार आहे. यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काळजी घ्यावी लागणार आहे ते जाणून घ्या.



मेष रास


मेष राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आयुष्यात काही मोठे बदल दिसू शकतात. तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असणार आहे. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. प्रवास करताना थोडी काळजी घ्या.



कर्क रास


या राशीच्या लोकांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. एखादा जुना आजार पुन्हा एकदा उद्भवू शकतो. तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. वादात सापडण्याची शक्यता आहे.



धनु रास


हे सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली तर योग्य ठरेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. तुमचा राग थोडा नियंत्रणात ठेवावा लागणार आहे. पार्टनरशी मोठं भांडणं होऊ शकतं.

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या