Filter Coffee : मांजरेकरांच्या ‘फिल्टर कॉफी’चा दरवळ रंगभूमीवर पसरणार

मुंबई : सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्यासाठी चहाच्या सोबतीला कॉफीचीही मागणी असते. मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी’ (Filter Coffee) नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे.


रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. ‘फिल्टर कॉफी’ नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.

याप्रसंगी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले ‘१९९२ साली मला हे नाटक करायचं होतं. त्यावेळी ते शक्य झालं नाही आता हे नाटक मी आणलं असून ते स्वतः दिग्दर्शित करतोय. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्य रसिकांना अनुभवायला मिळेल’. सस्पेन्स थ्रिलर असं हे नाटक आहे. मराठी नाट्यरसिक प्रगल्भ आहे. वेगळ्या संहिताचं स्वागत त्यांनी नेहमीचं केलं आहे. माझ्या सॊबतीने निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ अशी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेली कडू गोड चवीच्या 'फिल्टर कॉफी’ची ट्रीट नाट्यरसिक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला.



या नाटकाविषयी बोलताना अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणाला की, वैविध्यपूर्ण नाटक मराठी रंगभूमीवर येतायेत त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. रंगभूमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळतेय. नाटक हे नेहमी दिग्दर्शकाचं मानलं जातं. दिग्दर्शकाच्या नावामुळे नाट्यरसिक नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर याचं नाव त्यात अग्रस्थानी आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालोय. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हतं. आम्ही घेऊन येत असलेलं हे नाटक थ्रीलर जॉनरच असून काहीतरी वेगळं नाट्यरसिकांना पाहायला मिळणार याची खात्री देतो.


माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकासोबत काम करणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद असल्याचे अभिनेत्री उर्मिला कानिटकर हिने यावेळी सांगितले.


‘फिल्टर कॉफी’ (Filter Coffee) या नाटकाचे सहलेखन अभय देखणे तर सहाय्यक दिग्दर्शक सुरज कांबळे आहे. संगीताची जबादारी हितेश मोडक यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. वेशभूषा लक्ष्मण येलप्पा गुल्लार यांची आहे. दिपक कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य या नाटकासाठी लाभले आहे. दरम्यान ही कॉफी प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.