नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत १८१ बोगस लाभार्थीची नावे आढळून आली असून, हे लाभार्थी बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यास भेट देत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, बांगलादेशी घुसखोरीचा आणि सरकारी योजनांचा (PM Kisan) गैरवापर रोखणे अत्यावश्यक आहे.
ग्रामस्थांची सतर्कता आणि आठवडाभराच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. या १८१ लाभार्थ्यांना (PM Kisan) पहिला हप्ता वितरित करण्यात आला. मात्र, याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर पुढील हप्ते तत्काळ रोखण्यात आले. तहसीलदारांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचे मान्य केले असून, पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
सुरुवातीच्या तपासात या लाभार्थ्यांची बँक खाती बांगलादेशच्या सीमेलगत असलेल्या गावांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. हे प्रकरण केवळ (PM Kisan) एकाच योजनेपुरते मर्यादित आहे की अन्य योजनांच्या बाबतीतही असे घडले आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. गरज पडल्यास केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे.
भादवण गावातील जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. यामुळे हा घोटाळा वेळीच उघड झाला. मालेगाव जन्मदाखला घोटाळ्यासारखाच हा प्रकार मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतो. पोलीस आणि प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा (PM Kisan) तपास करून सत्य बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अजूनही काही बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत (PM Kisan) असण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दक्षतेमुळे पुढील आर्थिक नुकसान टळले असले, तरी हे संपूर्ण रॅकेट शोधण्यासाठी अधिक गहन तपासाची गरज आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…