'मुंबई श्री'चे पोझयुद्ध कोण जिंकणार ?

मुंबई : मुंबई शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती शुक्रवारी मुंबईकर क्रीडाप्रेमींना याची देही याची डोळा बघायला मिळणार आहे. त्यात कुणाचे बायसेप्स भारी असतील तर कुणाचे ट्रायसेप्स... काहींची छाती पाहून प्रेक्षकांचे उर भरून येईल तर कुणाची शोल्डर पाहून लय भारी वाटेल... वरच्या गटात तर काफ, थाइज, अ‍ॅब्ज आणि बॅक मसल्स म्हणजे जणू काही बारीक नसानसांचे विणलेले जाळेच असल्याचा अनुभव येईल... अत्यंत जोशपूर्ण वातावरण लोखंडवाला कॉम्पलेक्सच्या सेलिब्रेशन क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे पार पडणार्‍या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत शरीरसौष्ठवाचा सळसळता उत्साह पाहाण्यासाठी शरीरसौष्ठवप्रेमींचा जनसागर उसळणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून मुंबईच्या शरीरसौष्ठवाला नवा विजेता लाभणार आहे.



गेली चार महिने ज्या स्पर्धेत आपले पीळदार स्नायू दाखविण्यासाठी मुंबईचे युवा शरीरसौष्ठवपटू व्यायामशाळेत तासनतास घाम गाळत आहेत त्या मानाच्या आणि हक्काच्या मुंबई श्री स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा होत नसली तरी उद्या थेट स्पर्धेसाठी मुंबईतील तब्बल दोनशेपेक्षा अधिक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावतील. २०० पैकी ४० खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असून प्रत्येक खेळाडू रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल. प्रत्येक गटात किमान २० खेळाडू असल्यामुळे त्यापैकी पाच खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करताना रेप्रâीजना डोळ्यांत तेल घालून निरीक्षण करावे लागणार आहे.



शरीरसौष्ठवपटूंना मालामाल करणार्‍या या स्पर्धेला पुरस्कर्त्यांचा आणि कॉर्पोरेट जगताचा अपेक्षित पाठिंबा लाभला नाही. त्यामुळे स्पर्धेला अनंत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तरीही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आणि हितचिंतकांना मदतीचा हात दिल्यामुळे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने पुन्हा एकदा भव्य दिव्य स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलले आहे. त्यामुळे शुक्रवारीही मुंबई श्रीची भव्यता तशीच दिसेल, असे आश्वासन संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिले.

'मुंबई श्री'साठी काँटे की टक्कर

या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेसह महिलांचे शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्ट्स असे तीन प्रकार स्पर्धेत उतरणार आहे. अर्थातच मुंबई श्री स्पर्धेतील मुख्य फेरीतील ८, फिजीक स्पोर्ट्सचे २ आणि महिलांचा एक अशा ११ गटांमधून किमान २५० खेळाडू आपले पीळदार स्नायू दाखवतील. गणेश उपाध्याय, संदीप सावळे, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अरुण नेवरेकर, अमति साटम, संजय प्रजापती, अमोल जाधवसारखे खेळाडू आपल्या पीळदार सौष्ठवाच्या जोरावर मुंबई श्रीला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करतील. पण या खेळाडूंच्या व्यतिरिक्त काही असेही खेळाडू समोर येतील ज्यांना यापूर्वी मुंबईकरांनी पाहिलेही नसेल. तयारीतील खेळाडू मुंबई श्रीच्या किताबासाठी आपला दावा ठोकतील. त्यामुळे मुंबई श्री साठी पुन्हा एकदा काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी माहिती बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेश सावंत यांनी दिली.
Comments
Add Comment

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान