Western Railway Update : पश्चिम रेल्वेच्या होळीसह उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या

  61

मुंबई : होळी आणि उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने (Western Railway Update) विविध ठिकाणी विशेष भाड्याने ७ जोड्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल - कटिहार (साप्ताहिक) स्पेशल दर शनिवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११ वा. सुटेल आणि सोमवारी सकाळी ७.३० वाजता कटिहारला पोहोचेल. ही गाडी ८ मार्च ते २९ मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे कटिहार-मुंबई सेंट्रल ही गाडी दर मंगळवारी कटिहारहून सकाळी ००.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १८.४० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी ११ मार्च ते १ एप्रिलपर्यंत धावेल. वांद्रे टर्मिनस-बिकानेर ही गाडी दर शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता बिकानेरला पोहोचेल.



ही गाडी ७ ते २८ मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे बिकानेर - वांद्रे टर्मिनस ही गाडी दर गुरुवारी बिकानेरहून दुपारी ३ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ६ ते २७ मार्चपर्यंत धावेल. वांद्रे टर्मिनस - भगत की कोठी ही गाडी दर रविवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.३० वाजता भगत की कोठीला पोहोचेल. ही गाडी ९ ते ३० मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे भगत की कोठी - वांद्रे टर्मिनस ही गाडी दर शनिवारी भगत की कोठी येथून सकाळी ११.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ८ ते २९ मार्चपर्यंत धावेल.


वांद्रे टर्मिनस - जोधपूर सुपरफास्ट ही गाडी दर मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता जोधपूरला पोहोचेल. ही गाडी ११ ते २५ मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे जोधपूर - वांद्रे टर्मिनस स्पेशल दर सोमवारी जोधपूरहून संध्याकाळी ५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन १० ते २४ मार्चपर्यंत धावेल. ( Western Railway Update )

Comments
Add Comment

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही