बार्बाडोसकडून मिळालेल्या सर्वोच्च सन्मानासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार, पुरस्कार भारतीयांना समर्पित

बार्बाडोस : कोविड काळात भारताने दिलेली मदत आणि पाठिंबा याची जाणीव ठेवून बार्बाडोस सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा जाहीर गौरव केला. पंतप्रधान मोदी यांच्यावतीने 'ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस' हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन बार्बाडोसचे सरकार आणि तिथल्या जनतेचे जाहीर आभार मानले. बार्बाडोस सरकारने दिलेला पुरस्कार म्हणजे कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एक्स पोस्ट करुन पंतप्रधान मोदी यांनी बार्बाडोसचे आभार मानले.





बार्बाडोसचे पंतप्रधान अमोर मोटले यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी गुयानातील जॉर्जटाउनमध्ये भारत-कॅरिकॉम नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला.



कोविड-१९ साथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि मौल्यवान मदतीसाठी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे बार्बाडोस सरकारने जाहीर केले. महामारी काळात मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पाठिंब्यामुळे बार्बाडोसला या संकटातून सावरण्यास मदत मिळाली, असेही बार्बाडोस सरकारने सांगितले.

पंतप्रधान मोदींच्यावतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर पाबित्रा मार्गेरिटा यांनी बार्बाडोस सकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे, असे पाबित्रा मार्गेरिटा यांनी सांगितले.
Comments
Add Comment

School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून...

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधून एका अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेची बातमी समोर आली आहे.

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही