अमरावती : कडक उन्हाळा सुरू झाल्याने मेळघाटातील विविध भागात आगीच्या घटना लागत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली – आहे. धारणी सोल प्रोजेक्टसह चार्कदा गावात लागलेलया आगीच्या घटनेची ओरड शांत होत नाही तोच आता… चिखलदरा तालुक्यातील लवादा गावात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका आदिवासीच्या घरातील धुऱ्याला आग लागली. परंतु, चिखलदरा नपंच्या अग्निशमण विभागाचे वाहन ३० मिनिटे उशिरा आल्याने आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या घरात साठविलेले पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा अर्ध्या पेक्षा जास्त गावातील घरे आगीच्या विळख्यात आली असती लवादा गावातील दत्तुजी रामजी येवले (५५) हे त्यांच्या घरातील पाळीव पशूसाठी गावालगतच्या शिवारात चाराआणण्यासाठी गेले होते अशातच अचानक त्यांच्या घरातील धुऱ्याला आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. याबाबत कळताच दत्तजी येवले तातडीने घरी धावत आले.
Western Railway Update : पश्चिम रेल्वेच्या होळीसह उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या
गावातील काही लोकांनी चिखलदरा अग्निशमण विभागाला माहिती दिली. परंतु, बराच वेळ होऊनही अग्रिशमणचे वाहन न आल्याने गावकऱ्यांनी आपआपल्या घरात लहान-मोठ्या भांड्यांमध्ये साचविलेले पाणी आणून आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अन्यथा आग पसरली असता गावातील अर्ध्यापेक्षा जास्त घरे आगीच्या विळख्यात येऊन मोठया प्रमाणात वित्त व जिविताची, प्राण्याच्या जिवाची हानी झाली असती. या आगीत दत्तुजी येवलेंचे सुमारे ३० ते ४० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान अग्निशमण दलाच्या वाहनाने घटनास्थळी येऊन आगीवर पाण्याचा मारा केला. दत्तुजी येवले यांच्या घरावरून विजेचा तार गेला असल्याने शॉक सर्कीट होऊन आगीचा गोळा किंचा चिंगारी खाली पडल्याने ही आग लागली असल्याचे समजते. याबाबत कळताच चिखलदराचे तहसिलदार जीवन मोराणकर यांनी तात्काळ संबधीत पटवारीला दत्तुजी येवले यांच्या घरी लागलेल्या आगीचा पंचनामा करण्याचे आदेशदिले. तरदुसरीकडे गावकऱ्यांनी उन्हाळा सुरू झाला असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमणच्या वाहन चालकाचे रिक्त असलेल्या पदावर तत्काळ चालकाची नियुक्ती करण्याची मागणी नपं मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.