Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीWestern Railway Update : पश्चिम रेल्वेच्या होळीसह उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या

Western Railway Update : पश्चिम रेल्वेच्या होळीसह उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या

मुंबई : होळी आणि उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने (Western Railway Update) विविध ठिकाणी विशेष भाड्याने ७ जोड्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल – कटिहार (साप्ताहिक) स्पेशल दर शनिवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी ११ वा. सुटेल आणि सोमवारी सकाळी ७.३० वाजता कटिहारला पोहोचेल. ही गाडी ८ मार्च ते २९ मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे कटिहार-मुंबई सेंट्रल ही गाडी दर मंगळवारी कटिहारहून सकाळी ००.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १८.४० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी ११ मार्च ते १ एप्रिलपर्यंत धावेल. वांद्रे टर्मिनस-बिकानेर ही गाडी दर शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता बिकानेरला पोहोचेल.

MHADA Project : म्हाडा नाशिक मंडळातर्फे सदनिकांच्या नोंदणीस २० मार्चपर्यंत मुदतवाढ

ही गाडी ७ ते २८ मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे बिकानेर – वांद्रे टर्मिनस ही गाडी दर गुरुवारी बिकानेरहून दुपारी ३ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ६ ते २७ मार्चपर्यंत धावेल. वांद्रे टर्मिनस – भगत की कोठी ही गाडी दर रविवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.३० वाजता भगत की कोठीला पोहोचेल. ही गाडी ९ ते ३० मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे भगत की कोठी – वांद्रे टर्मिनस ही गाडी दर शनिवारी भगत की कोठी येथून सकाळी ११.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ८ ते २९ मार्चपर्यंत धावेल.

वांद्रे टर्मिनस – जोधपूर सुपरफास्ट ही गाडी दर मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता जोधपूरला पोहोचेल. ही गाडी ११ ते २५ मार्चपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे जोधपूर – वांद्रे टर्मिनस स्पेशल दर सोमवारी जोधपूरहून संध्याकाळी ५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन १० ते २४ मार्चपर्यंत धावेल. ( Western Railway Update )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -