सोलापूर : घरगुती गॅस सिलिंडचा स्फोट होऊन घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य व छप्पर जळून घरातील दिव्यांग व्यक्तीचा भाजल्याने मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जेऊर (ता. अक्कलकोट) शिवारातील वस्तीवर घडली. घटनेची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
इरण्णा मलकप्पा म्हेत्रे (वय ५५, रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) असे मृताचे नाव आहे. रेवणसिद्ध मलकप्पा म्हेत्रे (वय ४५, रा. गौडगाव बु, ता. अक्कलकोट) यांनी पोलिसांना सांगितले की ते कुटुंबासह जेऊर शिवारातील शेतात राहण्यास आहेत. इरण्णा मलकप्पा म्हेत्रे हा दिव्यांग होता.
https://prahaar.in/2025/03/07/l-and-t-one-day-menstrual-leave-s-n-subramanian-introduces-one-day-menstrual-leave-per-month-for-women/
बुधवारी रेवणसिद्ध म्हेत्रे नेहमीप्रमाणे शेतातील लिंबू तोडून बाजारात जाऊन विकून परत आले होते. त्यानंतर जेवण करून घरी झोपले होते. साधारण रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भावाचे वस्तीकडे मोठा आवाज आल्याने व आरडाओरड होत असल्याने रेवणसिद्ध म्हेत्रे यांना जाग आली. तेव्हा त्यांनी चुलत भाऊ गुरुशांत गणपती म्हेत्रे, प्रशांत महांतेश माळी यांना सोबत घेऊन भाऊ इरण्णा मलकप्पा म्हेत्रे याचे वस्तीकडे गेले.