Satara : आईच्या आग्रहाने वाचले मुलाचे प्राण!

सातारा : प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेल्यांची संख्या अधिक आहे. यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. मात्र तरीही अनेक तरुण हेल्मेट न घालता प्रवास करताना दिसून येतात. अशीच काहीशी घटना साताऱ्यात घडली आहे.



साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातील सूरज जाधव (२४) हा तरुण त्याचा मित्र पिंटू ऊर्फ राजेश रिदि (२४) यासह दुचाकीवरुन पुण्याला निघाला होता. मात्र यावेळी तो हेल्मेट न घालता घराबाहेर पडला. हेल्मेट न घेता मुलगा घरातून बाहेर गेला मुलान हेल्मेट घालावं, असं आईला मनोमन वाटत होत. 'हेल्मेट घालूनच गाडी चालव' असा आग्रह देखील सूरजच्या आईने धरला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला. आईला घरात हेल्मेट दिसल्याने ती स्वत: पाठोपाठ हेल्मेट घेऊन निघली. मुलाला जिथे आहे, तिथेच थांबण्यास सांगितले. पुढे गेला असशील, तर मी तिथपर्यंत येते, असाही आग्रह आईने धरला. त्यामुळे सूरजने दुचाकी पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वळवली आणि घरी येऊन हेल्मेट घेतले.


सूरजने घरातून निघताना 'आई, मी नेहमीच गाडीवरून जातो. कशाला टेन्शन घेतेस? असं तो म्हणाला. मात्र काही सांगू नकोस. तू हेल्मेट डोक्यात घाल आणि आणि पोहोचल्यानंतर फोन कर. असं सांगत आईनं मुलाला निरोप दिला. परंतु अवघ्या दिड तासात आईचा फोन खणखणला. तुमच्या मुलाचा अपघात झाला. दोघांनाही पुण्याला हलवलंय. ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. शेजाऱ्यांन सोबत ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन वाजला. यावेळी ''आई, मी सूरज बोलतोय, आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे. पण, पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला अॅडमिट करतोय. आई तू हेल्मेट दिल्यामुळे माला काहीही झालं नाही. परंतु पिंटूने हेल्मेट न घातल्यामुळे तो कोमा गेला आहे''. सूरजने असे सांगताच आईच्या जीवात जीव आला.


त्यानंतर सूरजची आई पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाला सुखरूप पाहताच आईने कडकडून मिठी मारली. मात्र, सूरजचा मित्र राजेश या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या आईच्या एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसू अशी अवस्था निर्माण झाली होती.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह