नाशिक: चारित्र्याचा संशयावरून रागाच्या भरात पतीने १९ वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहिद अरुण चित्ते पुलाजवळील टाकून दिला. मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
अमृताकुमारी विकीरॉय यादव (१९ सध्या रा. सातपूर, मूळ नेपाळ) असे मृत पत्नीचे नाव आहे. विकीरॉय यादव (२०) असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर व ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले.
दरम्यान, चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे, यासाठी पत्नीचा छळ केला. त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला व मृतदेह झुडूपात टाकून पळ काढला. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. पुढील तपास नाशिक तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…