Nitesh Rane : 'केम छो वरळी' आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके, 'अजान स्पर्धा' घेणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना ठोकले


मुंबई : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. 'केम छो वरळी'चे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांनी, 'अजान स्पर्धा' घेणाऱ्यांनी मराठी (Marathi) भाषेवर बोलण्याचा किंवा आमदार भैयाजी जोशींवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले. एवढेच नाही तर मराठी भाषेवर आदित्य ठाकरे यांनी बोलूच नये, अशी टीका मंत्री राणे यांनी केली.


तसेच शिवरायांचा अपमान करणा-या जितेंद्र आव्हाडांवर कारवाई का केली नाही. राहून गांधींवर कारवाईची मागणी का केली नाही, असा थेट सवाल सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी (Nitesh Rane) केला.



मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीदरम्यान स्वतःच्या वरळी मतदारसंघांमध्ये "केम छो वरळी" असे बॅनर लावले होते, अशा व्यक्तींनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हटलं तर आश्चर्य आहे. तसेच उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्या उबाठा गटाने मराठी प्रेम दाखवणे देखील आश्चर्यच आहे.


मराठी आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेलाच आम्ही प्राधान्य देतो. राज्यातल्या अन्य भाषांचा अपमान न करता व त्यांच्या भावना न दुखावता मराठी भाषेला प्राधान्य देणे ही आमच्या शासनाची भूमिका आहे.



कोरटकर असो की कोणीही असो, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्याला आमचे शासन कडक शिक्षा करणार हे निश्चित.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर व त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आमचे राज्य चालवत आहोत, त्या राजाचा कोण अपमान करत असेल तर यापेक्षा मोठी शिक्षा असू शकत नाही, म्हणून अशा व्यक्तींना आमचा देवाभाऊच्या सरकारमध्ये कडक शिक्षा केली जाईल, ही आमची भूमिका ठाम आहे, असेही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून