S. Jaishankar On Pok : पीओके परत मिळाल्यावर शांतता नांदेल; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचं मोठं विधान

लंडनमध्ये जम्मू-काश्मीर संदर्भात महत्वाचे विधान


नवी दिल्ली : 'जयशंकर POK वर बोलताना'...जम्मू-काश्मीरचा पाकिस्तानने बळकावलेला भूभाग पाकव्याप्त काश्मीर (Pok) परत घेण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करतोय. पीओके भारतात विलिन होताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित होईल असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले आहे. जयशंकर सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये "जगात भारताचा उदय आणि भूमिका" या विषयावर परराष्ट्रमंत्री बोलत होते.


एस. जयशंकर यांनी काश्मीर आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल भाष्य केले. त्यात कलम ३७० हटवणे, आर्थिक उपाययोजना आणि मतदानात लोकांचा सहभाग वाढवणे आदी मुद्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत डॉलरच्या वापराबद्दल ब्रिक्स देशांच्या मतांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. जम्मू-काश्मीर संदर्भात 'जयशंकर POK वर बोलताना 'म्हणाले की, काश्मीरमधील बहुतांश समस्या सोडवण्याचे चांगले काम आम्ही केले आहे. मला वाटते की कलम ३७० हटवणे हे एक पहिले पाऊल होते. त्यानंतर, काश्मीरमध्ये विकास, आर्थिक उलाढाल आणि सामाजिक न्याय पुर्नस्थापित करणे हे दुसरे पाऊल होते. निवडणुकांमधील मतदानात लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवणे हे तिसरे पाऊल होते. आता आम्ही पाकिस्तानने बळकावलेला जम्मू-काश्मीरचा भाग परत मिळण्याची वाट पाहत आहोत. पाकव्याप्त काश्मीर परत मिळवल्यानंतर काश्मीरचा मुद्दा सुटेल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.



जयशंकर पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेतील प्रशासन बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत आहे. जे भारताच्या हिताशी सुसंगत असे आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली आहे.


आयात शुल्काबाबत (टॅरिफ) जयशंकर म्हणाले की, गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. यानंतर आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहेत. आम्ही शुल्काबाबत (टॅरिफ) खुली चर्चा केली. त्या चर्चेनंतर द्विपक्षीय व्यापार कराराच्या आवश्यकतेवर सहमतील झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

अहमदाबाद : सध्या देशभरात कार मॉडिफिकेशनचं वारं वाहत असलं तरी गुजरातच्या एका पठ्ठ्याने मात्र कल्पकतेच्या सर्व

Sikkim Landslide : भूस्खलनात अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराचे युद्धपातळीवर प्रयत्न

- भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन हिम सेतू'ला सुरुवात भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममधील लाचेन

Gangster Atiq Ahmed : प्रयागराज हादरलं! गँगस्टर अतीक अहमदच्या ड्रायव्हरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान,

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)