मुंबई: मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दादर- रत्नागिरी आणि दौंड – कलबुर्गी दरम्यान ३४ अनारक्षित होळी विशेष ट्रेन चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१) दादर – रत्नागिरी अनारक्षित विशेष – त्रि-साप्ताहिक (६ सेवा)
01131 अनारक्षित विशेष गाड्या दि. ११.०३.२०२५ (मंगळवार), १३.०३.२०२५ (गुरुवार) आणि १६.०३.२०२५ (रविवार) रोजी दादर येथून १४.५० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी २३.४० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
01132 अनारक्षित विशेष ट्रेन दि. १२.०३.२०२५ (बुधवार), १४.०३.२०२५ (शुक्रवार) आणि १७.०३.२०२५ (सोमवार) रोजी रत्नागिरी येथून ०४.३० वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (३ सेवा)
थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर
डब्यांची रचना : १४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी व सामानासह गार्डस कोच
२) दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष – आठवड्यातून ५ दिवस (२० सेवा)*
01421 अनारक्षित विशेष ट्रेन दि. १०.०३.२०२५ ते २२.०३.२०२५ पर्यंत दौंड येथून ०५.०० वाजता सुटेल (१३.०३.२०२५, १६.०३.२०२५ आणि २०.०३.२०२५ वगळता) आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. (१० सेवा)
01422 अनारक्षित विशेष ट्रेन दि. १०.०३.२०२५ ते २२.०३.२०२५ पर्यंत (१३.०३.२०२५, १६.०३.२०२५ आणि २०.०३.२०२५ वगळता) कलबुरगि येथून १६.१० वाजता सुटेल आणि दौंड येथे त्याच दिवशी २२.२० वाजता पोहोचेल. (१० सेवा)
थांबे : भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर
संरचना : १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह सामान-सह- गार्डस कोच
३) दौंड-कलबु्र्गी अनारक्षित विशेष – द्वि-साप्ताहिक (८ सेवा)*
01425 अनारक्षित विशेष ट्रेन दि. ०९.०३.२०२५, १३.०३.२०२५, १६.०३.३०२५ आणि २०.०३.२०२५ (गुरुवार आणि रविवार) रोजी दौंड येथून सकाळी ५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
01426 अनारक्षित विशेष ट्रेन दि. ०९.०३.२०२५, १३.०३.२०२५, १६.०३.३०२५ आणि २०.०३.२०२५ (गुरुवार आणि रविवार) रोजी कलबुरगि येथून २०.३० वाजता सुटेल आणि दौंड येथे दुसऱ्या दिवशी ०२.३० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
थांबे : भिगवण, पारेवाडी, जेउर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर.
डब्यांची रचना : १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीयसह लगेज-कम-गार्ड्स कोच
सामान्य शुल्कासह अनारक्षित विशेष गाड्यांसाठी तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील. या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.