Ind-Aus सेमीफायनलसाठी अंपायर्सच्या नावांची घोषणा, चाहते होतील खुश!

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. हा सामना ४ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी अंपायर्स आणि मॅच रेफ्रींची नावे समोर आली आहेत. रिचर्ड एलिंगवर्थ(इंग्लंड) आणि क्रिस गॅफनी (न्यूझीलंड) फिल्ड अंपायर्सची भूमिका निभावतील. तर थर्ड अंपायरिंगची जबाबदारी मायकेल गफ(इंग्लंड) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


तर एड्रियन होल्डस्टॉक(दक्षिण आफ्रिका) हे चौथ्या अंपायरची भूमिका निभावतील. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलमध्ये झिम्बाब्वेचे अँडी पायक्राफ्ट मॅच रेफ्री म्हणून असतील.


भारतीय चाहत्यांसाठी चांगली बाब म्हणजे रिचर्ड कॅटलबोरो(इंग्लंड) यांचे नाव अंपायर्सच्या यादीतून बाहेर आहे. कॅटलबोरो जेव्हा जेव्हा मोठ्या सामन्यांमध्ये अंपायर्स होते तेव्हा भारताचे नुकसानच झाले.


मोठ्या सामन्यांमध्ये रिचर्ड कॅटलबोरो अंपायर असताना भारताने अनेक सामने गमावलेत. क्रिकेट वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये कॅटलबोरो हे मैदानावर अंपायर म्हणून होते. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप सेमीफायनल(२०१९) आणि टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये कॅटलबोरो अंपायर होते. २०२३मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही रिचर्ड यांनी तिसऱ्या अंपायरची भूमिका निभावली होती.


यासोबतच २०१४च्या टी-२० वर्ल्डकप, २०१५ वनडे वर्ल्डकप, २०१६ टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी(२०१७)च्या नॉकआऊट सामन्यातही कॅटलबोरो अंपायर होते.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे