घोटीत अवैध व्यवसायांनी लोक त्रस्त

इगतपुरी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू असून, यामुळे महिलांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. गावठी दारू, अमली पदार्थ, जुगार आणि सट्टेबाजी खुलेआम सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी, पोलीस कारवाई संदर्भात केवळ आश्वासनांवरच समाधान मानत लागत असल्याची स्थिती आहे.


गावठी दारू, अमली पदार्थांचा बाजार तेजीत सुरु असून गांजा, मटका, जुगार, काळा पिवळा, गावठी कट्टे, गावठी दारूचे कॅन, बनावट इंग्लीश दारू असे अनेक धंदे राजरोसपणे सुरु आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात  सुरु आहे.



मात्र, पोलिसांकडून यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीबेरात्री टवाळ खोरी वाढत चालली आहे. सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले असून, टोळक्यांमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. गुटखा आणि इतर नशेच्या वस्तू वाइन शॉपच्या बाहेरील टपऱ्यांवर खुलेआम विक्रीस आहेत.


शहरात वीस ते पंचवीस भंगारांचे दुकाने थाटून बसलेले आहेत. त्याचप्रमाणे घोटीमध्ये घोटी सिन्नर महामार्गावरील वजन काट्याच्या बाजूला अवैध काटा सुरु असून त्याच बरोबर इतर ही चार ते पाच ठिकाणी अवैध काटा जोमाने सुरु आहे. यामध्ये बाहेरून आलेल्या गाड्यांमधील स्टील इतर धातू भरलेले असतात. चालक ते स्टील अवैध काटा असलेल्या ठिकाणी जुन्या शेडमध्ये उतरून घेऊन ते स्टील नाशिक येथे निम्म्या रात्री विकले जातात.

Comments
Add Comment

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस