Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन – "न्यायाला विलंब होऊ नये, आम्ही कटिबद्ध"

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh Murder Case) फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृत निवेदन (NCP statement after Dhananjay Munde's post) जारी करण्यात आले आहे.



संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी


या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही पक्षाची ठाम भूमिका आहे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतः राजीनामा दिला, ही सकारात्मक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध


राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध आहे आणि न्यायप्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन नैतिकता जपली असून, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे पक्षाने सांगितले. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही दबावाशिवाय पार पडेल, असे आश्वासनही निवेदनातून देण्यात आले आहे.



आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा


संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.





न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास


या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments
Add Comment

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात