
मुंबई : क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्या विरोधात ४ मार्च या दिवशी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे येथील किरण नाकती यांनी अबू आझमी यांच्या विरोधात तक्रार केली होती.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताची ओळख ‘सोने की चिडियाँ’, अशी होती, अशा शब्दांमध्ये अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांवर ४० दिवस क्रूरपणे अत्याचार करणार्या, हिंदू महिलांवर अत्याचार करणार्या, हिंदूंचे धर्मांतर करणार्या आणि मंदिरे तोडणार्या औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणून हिंदूंच्या भावनांचा अवमान आहे, असे किरण नाकती यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले की, कपडे धुणे, साफसफाई आणि ड्राय-क्लीनिंग ...
त्यानुसार भादंवि कलम २९९, ३०२, ३५६(१) आणि ३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.