Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात कारची एसटी बसचा जोरदार धडक! कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू




रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि चारचाकी गाडीची जोरदार धडक झाली असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. (Tamhini Ghat Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीट वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खेड-चिंचवड दिशेने जाणाऱ्या एसटी बसला बसला विळे गावाच्या दिशेकडे येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक बसली. उतार व वेग असल्यामुळे, तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे. त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला

यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले.


दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास डकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले. तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर, एसटी मधील कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Tamhini Ghat Accident)


Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री