बृहमुंबई महानगरपालिका : मुंबईतील ३४ रुग्णालयात विशेष स्वच्छता मोहिम

४९ मेट्रिक टन राडारोडा, ४३ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट


मुंबई : स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यमय महानगरासाठी सदैव तत्पर असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) सोमवार पासून मुंबईत 'विशेष स्वच्छता मोहीम - रूग्णालय' सुरूवात केली. स्वच्छता मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शासकीय, महानगरपालिका आणि खासगी अशा एकूण मिळून ३४ रूग्णालयांच्या परिसरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांच्या कालावधीत ३४ रूग्णालयांच्या परिसरातून ४९ मेट्रिक टन राडारोडा, ४३ मेट्रिक टन कचरा आणि २४ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तूंचे संकलन करत विल्हेवाट लावण्यात आली. तब्बल १ हजार ५२३ कर्मचारी - कामगारांनी १३५ संयंत्रांच्या सहाय्याने ही कामगिरी केली.


बृहमुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व रूग्णालयांमध्ये 'विशेष स्वच्छता मोहीम' राबविण्यात येत आहे. या मोहिमेस सोमवारी ०३ मार्च २०२५ सर्व प्रशासकीय विभागातील रूग्णालयांमध्ये एकाचवेळी प्रारंभ करण्यात आला. यामध्ये महानगरपालिका कामगार-कर्मचारी, रुग्णालय प्रशासन यांसह स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


Brihanmumbai Municipal Corporation : विशेष स्वच्छता मोहिमेत कामा व आल्बेस रूग्णालय, नागपाडा पोलिस रूग्णालय, बृहमुंबई महानगरपालिकेचे शीव (सायन) रूग्णालय, राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रूग्णालय, व्ही. एन. देसाई रूग्णालय, एस. के. पाटील रूग्णालय, चोक्सी प्रसूतिगृह, टोपीवाला प्रसूतिगृह, भाभा रूग्णालय (कुर्ला), शताब्दी रूग्णालय, दिवालीबेन मेहता रूग्णालय, राजावाडी रूग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय (टागोर नगर) , के. सी. एल. भन्साळी प्रसूतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यासह साबूसिद्दीक रूग्णालय (चंदनवाडी), सैफी रूग्णालय, लाईफ केअर रूग्णालय, माहीम प्रसूतिगृह, नानावटी रूग्णालय, एस.जे.डी.सी. प्रसूतिगृह, आपला दवाखाना (चारकोप), चारकोप दवाखाना, वाय. आर. तावडे दवाखाना आदी परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाबाबत रुग्णालयातील कर्मचारी व नागरिकांना जागरूक करण्यावर विशेष भर देण्यात आला.


Brihanmumbai Municipal Corporation उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, विशेष स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रामुख्याने रुग्णालय अंतर्गत परिसर, बाह्य परिसर, लगतचे पदपथ, वाहनतळ यांची स्वच्छता करण्यात येत आहे. घनकच-यासमवेतच राडारोड्याचेही संकलन केले जात आहे. जैव-वैद्यकीय कच-याच्या (Bio Medical Waste) व्यवस्थापनाची जबाबदारी नियमानुसार रूग्णालय प्रशासनाची आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान झाडलोट,सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, बेवारस साहित्याची विल्हेवाट, कचरा संकलन, पाणी फवारणी करून स्वच्छता, अनधिकृत वाहनतळ आणि पार्क केलेल्या वाहनांखालील कच-याची स्वच्छता, वाढलेली झाडेझुडपे, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या आहेत.


Brihanmumbai Municipal Corporation : ३ मार्च २०२५ पासून सुरू झालेली ही मोहीम पुढील १५ दिवस म्हणजेच १७ मार्च २०२५ पर्यंत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये सुरू राहणार आहे. शासकीय, बृहमुंबई महानगरपालिका रूग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य केंद्र यांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती