नवी मुंबई : परिणीता सोशल फाऊंडेशन या संस्थेचा परिणीता सन्मान हा पुरस्कार सोहळा मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येत आहे. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
परिणीता सन्मान या पुरस्कारासाठी खालील विभागातून अर्ज करू शकता. वैद्यकीय (किमान ५ वर्ष अनुभव, स्वतःचे क्लिनिक असल्यास प्राधान्य) ज्योतिष तज्ज्ञ (किमान ५ वर्ष कार्यरत असणे आवश्यक) सीए (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) वकिल (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) आर्किटेक्ट (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) रियल इस्टेट (स्वत:ची फर्म असल्यास प्राधान्य) शिक्षण (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) हॉटेल व्यवसाय (स्वतःचे हॉटेल असल्यास प्राधान्य) घरगुती उत्पादने (किमान ५ वर्षांचा अनुभव, स्वत:चे उत्पादन आवश्यक) कापड व्यवसाय (स्वतःचे वर्कशॉप / शोरूम असल्यास प्राधान्य) ज्वेलरी व्यवसाय (स्वतःचे शोरूम असल्यास प्राधान्य) फॅशन डिझायनिंग (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) ब्युटी पार्लर (किमान ५ वर्षांचा अनुभव, स्वतःचे पार्लर असल्यास प्राधान्य) पायलट (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) या विभागातून प्रत्येकी तीन नामांकनं घोषीत होणार असून त्यापैकी एकाला यावर्षीचा परिणीता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
परिणीता कला सन्मान हा घोषीत पुरस्कार विभाग आहे. यात खालील विभागातून अर्ज करू शकता. अभिनेत्री (किमान ५ वर्षांचा अनुभव, व्यावसायिक महिला कलाकार ) मॉडेल (ब्रँड अँबेसिडर्स असल्यास प्राधान्य) नर्तिका (विशारद परीक्षा उत्तीर्ण आवश्यक, व्यावसायिक असणाऱ्यांना प्राधान्य) गायिका (विशारद परीक्षा उत्तीर्ण आवश्यक, व्यावसायिक असणाऱ्यांना प्राधान्य) महिला लेखिका (किमान ५ वर्षांचा अनुभव, व्यावसायिक लेखिकांना प्राधान्य) निर्माति-दिग्दर्शिका (किमान ५ वर्षांचा अनुभव, व्यावसायिक असणाऱ्यांना प्राधान्य) राजकारणी महिला (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) पोलीस अधिकारी (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) शासकीय अधिकारी (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) वृत्तनिवेदिका (किमान ५ वर्षांचा अनुभव, कार्यरत असणे आवश्यक) महिला एन्फ्लुएन्सर (1M Followers Required). या विभागांसाठी मानांकनं जाहीर होणार नाहीत तर आलेल्या अर्जातून थेट पुरस्कार घोषित होणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना मंगळवारी, भारत – ऑस्ट्रेलिया आमनेसामने
या पुरस्कारासाठी अर्ज करणारी महिला परिणीता सोशल फाऊंडेशनची सदस्या असणे बंधनकारक आहे. ज्या महिला सदस्य नाहीत आणि त्यांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याआधी सदस्य व्हावं. परिणीता सोशल फाऊंडेशनची वार्षिक सभासद फी यावर्षी पासून सहाशे रुपये आहे. ज्या व्यावसायिका या पुरस्कारासाठी अर्ज करणार आहेत त्याच्याकडे त्यांच्या व्यवसायासंंबंधीत अधिकृत कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२५ आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारता येणार नाहीत.
पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उद्योजिकांनी त्वरीत परिणीता सोशल फाऊंडेशन – +91 9619949843 प्रसाद हनुमंते +91 7666327009 किंवा वेदांग सागवेकर – +91 8850121548 या संपर्क क्रमांकावर व्हॉटस अप मेसेज करावा.