Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीP. L. Deshpande Happines Index : पु. ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस...

P. L. Deshpande Happines Index : पु. ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स म्हणून पु. ल. देशपांडे यांचे कार्य असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भर त्यांनी घातली आहे. त्यांच्या विनोदबुद्धी आणि भाषाशैली तसेच त्यांच्या साहित्यातून मिळणारा आनंद निखळ होता. कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकाचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि.स.खांडेकर, पु.ल.देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले. संस्कृती आणि सभ्यता यांचे मूल्यमापन त्याठिकाणी जोपासल्या गेलेल्या साहित्य, संस्कृती आणि भाषेमुळे होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

Madhavi Puri Buch FIR : सेबीच्या माजी अध्यक्षांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला एकादमीचे संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाने नाटकाप्रती आपले प्रेम जोपासले आहे. नाटकाचे अनेक प्रयोग होतात, देशात या क्षेत्रात मराठी कलावंतांचे काम महत्त्वाचे आहे. पु.ल.अकादमी सारख्या वस्तू भविष्यात राज्यात तयार होतील. रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाला साजेशे काम इथे झालेले आहे. सध्या गावोगावी नाट्य मंदिराची अवस्था वाईट आहे.

यासाठी संस्कृतीक कार्य विभागाने निधीची मागणी करावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. संस्कृतीक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार म्हणाले,“रवींद्र नाट्य मंदिर ही एक पवित्र वास्तू असून, सर्वार्थाने पावित्र्य टिकवणारी वास्तू आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिल २०२५ ला पु. ल. अकादमीत होईल,अशी घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड.शेलार यांनी यावेळी केली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारघे यांनी या कार्यक्रमात प्रास्ताविक केले तर पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -