मुंबई : शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या कथित प्रकरणात, मुंबईतील विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यासह बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे येथील पत्रकार सपन श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विशेष न्यायाधीश एसई बांगर यांनी हा आदेश दिला. त्यांनी शेअर बाजारातील कंपनीच्या यादीत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
सुनावणीच्या वेळी तक्रारदाराने असा युक्तिवाद केला की, “सेबीच्या अधिकारी त्यांचे वैधानिक कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले, त्यांनी बाजारातील फेरफारला चालना दिली आणि निर्धारित निकषांची पूर्तता न करणाऱ्या कंपन्यांना सूचीबद्ध होण्याची परवानगी देऊन कॉर्पोरेट फसवणुकीस हातभार लावला.” तसेच या तक्रारीत सेबीच्या अधिकाऱ्यांवर नियमांचे पालन न करणाऱ्या कंपनीच्या लिस्टिंगला परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे बाजारात फेरफार आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. सेबी आणि कॉर्पोरेट संस्थांमध्ये संगनमत, इनसायडर ट्रेडिंग आणि लिस्टिंगनंतर सार्वजनिक निधीची उधळपट्टी केल्याचा आरोपही करण्यात
आला आहे.
“न्यायमूर्ती पुढे म्हणाले, “आरोप हे दखलपात्र गुन्हा असल्याचे स्पष्ट आहे, नियामक त्रुटी आणि संगनमताचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, ज्यासाठी निष्पक्ष चौकशीची आवश्यकता आहे.”