HSRP : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी 'एचएसआरपी' अनिवार्य

  55

मुंबई : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट - HSRP) बसविणे अनिवार्य आहे.


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.



नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.


प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. ली. ही एजेंसी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे.


वाहन धारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला तरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.


वाहनधारकांना त्यांच्या वाहनांकर ही नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करु शकतात.


प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहन धारक व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.


ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मुंबई (मध्य) यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.