IPS Officers : राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनोज कुमार शर्मा यांची कायदा - सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती


मुंबई  : राज्य सरकारने शुक्रवारी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, सात आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. यात तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षक पदावरून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उप महानिरीक्षक पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे.



बारावी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांनाही पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नियुक्ती कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. या बदल्यांच्या यादीत आयपीएस अधिकारी निखिल गुप्ता आणि आयपीएस अधिकारी सुरेश मेखला यांचीही नावे आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, निखिल गुप्ता सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन या विभागात कार्यरत आहेत.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ