आघाडीचे शिलेदार परतले, अय्यर - पटेलने सावरले

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळत असलेल्या भारताला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या आघाडीच्या फलंदाजांना अवघ्या ३० धावांत बाद केले.



शुभमन गिल दोन धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर पायचीत झाला. रोहित शर्मा १५ धावा करुन जेमीसनच्या चेंडूवर विल यंगकडे झेल देऊन परतला. विराट कोहली ११ धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर ग्रेन फिलिप्सकडे झेल देऊन परतला. याआधी भारत सलग १३ व्यांदा नाणेफेक हरला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग दहाव्यांदा नाणेफेक हरली. नाणेफेकीचा कौल विरोधात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासाठी घातक ठरले.

आघाडीचे फलंदाज बाद झाल्यामुळे टीम इंडियाची भिस्त आता मधल्या फळीवर आहे. चौथ्या विकेटसाठी सावध खेळी करत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल ही जोडगोळी भारताच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. टीम इंडियाने २१ षटकांत तीन बाद ८४ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर ३२ आणि अक्षर पटेल २१ धावांवर खेळत आहे.
Comments
Add Comment

India vs England : रोहित शर्माचे लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतक, सचिनचा विक्रमही मोडला

India vs England  : भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावत पुन्हा एकदा

IND vs ENG : लॉर्ड्सवर रोहित-गिलचा धडाका; भारताच्या नावावर नवा विक्रम

IND vs ENG : भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार शुभमन गिल (Shubman

FIFA World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा सलग दुसऱ्यांदा गोल्डन बूटवर कब्जा; मेस्सीला मागे टाकत रचला इतिहास

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2026) २०२६ चे विजेतेपद स्पेनने (Spain) पटकावले असले, तरी स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या

FIFA World Cup 2026 : गोल्डन बॉल रोड्रीला, गोल्डन बूट एम्बाप्पेला; FIFA World Cup 2026 पुरस्कारांची संपूर्ण यादी

FIFA World Cup 2026 Awards Winners List : फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) स्पर्धेनंतर वैयक्तिक पुरस्कारांची (Individual Awards) घोषणा करण्यात आली असून

FIFA WORLDCUP 2026 : विश्वविजेतेपद स्पेनच्या नावावर; अर्जेंटिनाला १-० ने दिली मात!

न्यूयॉर्क: फुटबॉल विश्वाच्या महाकुंभाचा पडदा आज

FIFA WORLDCUP 2026 : पहिल्या हाफचा थरार, स्पेनचे वर्चस्व; अर्जेंटिनाचा बचाव सज्ज

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात आज गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात रंगतदार लढत सुरू