नवी दिल्ली : दिल्लीतील १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना ३१ मार्चनंतर पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, अशी घोषणा पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी केली. राजधानीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मोठी हॉटेल्स, विमानतळ, बांधकाम स्थळांना प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अँटी-स्मॉग गन बसवणे बंधनकारक असणार आहे.
IPS Officers : राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
क्लाउड सीडिंगसाठी आवश्यक असलेली परवानगी घेऊ व दिल्लीमध्ये जेव्हा गंभीर प्रदूषण असेल तेव्हा क्लाउड सीडिंगद्वारे पाऊस पाडता येईल आणि प्रदूषण नियंत्रित करता येईल याची आम्ही खात्री करू, अशीही माहिती सिंग सिरसा यांनी दिली.