मुंबई श्री चा धमाका ७ मार्चला

'मुंबई श्री'मध्ये मुंबईतील २५० पेक्षा जास्त शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार


मुंबई : मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितले.


अडीचशे खेळाडूंचा सहभाग


मुंबई श्री स्पर्धेतील मुख्य फेरीतील ८, फिजीक स्पोर्ट्सचे २ आणि महिलांचा एक अशा ११ गटांमधून किमान २५० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज आहे. संदीप सावळे, गणेश उपाध्याय, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अरुण नेवरेकर, अमति साटम, संजय प्रजापती, अमोल जाधवसारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. त्यामुळे स्पर्धेतील विजेत्याला सव्वा लाखांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच द्वितीय विजेता आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे ५० आणि २५ हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाईल. ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना १०,८,६,४,२ हजार रोख बक्षीस लाभेल. एवढेच नव्हे तर पुढील पाच क्रमांकानाही एक हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजन तपासणी आणि प्राथमिक चाचणी ७ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणीच सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत केली जाणार असल्याची माहिती उपनगर संघटनेचे सरचिटणीस विशाल परब यांनी दिली.

फिजीक स्पोर्ट्स आणि महिला शरीरसौष्ठवाची वाढती क्रेझ


शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस फिजीक स्पोर्ट्स आणि महिलांच्या शरीरसौष्ठवाची क्रेझ वाढू लागली आहे. स्पर्धेत स्पर्धकांचा सहभाग वाढत असल्यामुळे आयोजकांना या गटांकडेही आपले लक्ष केंद्रित करावे लागत आहे. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये खेळाडूंची सहभाग संख्या शंभराच्या आसपास असल्यामुळे हा गट दोन गटात विभागला गेला आहे. हे दोन्ही गट उंचीवर खेळविले जाणार असल्यामुळे त्यांची १७० सेमीपर्यंत आणि १७० सेमीवरील अशी विभागणी करण्यात आली आहे. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस मुंबई या किताबासाठी संघर्ष होणार असल्यामुळे पुन्हा एकदा रेखा शिंदे आपले जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करील. तिला किमया बेर्डे, ममता येझरकर, राजश्री माहिते, रिद्धी पारकर आणि के लविना यांच्याशी तगडी लढत द्यावी लागणार असल्याची माहिती सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

स्पर्धकांना संपर्काचे आवाहन

मुंबई श्री म्हटले की सहभागासाठी खेळाडूंची अक्षरशा झुंबड उडते. त्यामुळे कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून सुनील शेगडे (९२२३३४८५६८), राजेश निकम (९९६९३६९१०८), राम नलावडे (९८७०३०६१२७), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), विजय झगडे (९९६७४६५०६३), जयदीप पवार (८०८०८०९४३८), गिरीश कोटियन (७७३८५४५२३०), सुभाष जाधव (९००४३१३४३९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपनगर संघटनेचे अध्यक्ष किट्टी फणसेका यांनी शरीरसौष्ठवपटूंना केले आहे.
Comments
Add Comment

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान