Palghar News : कंपनीच्या उच्छादामुळे स्थानिकांचा तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

  89

वाडा : वाडा तालुक्यातील वावेघर येथील एका कंपनीच्या त्रासाला स्थानिक आदिवासी मेटाकुटीला आले असून अनेकदा तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने करायचे काय असा सवाल लोकांना पडला आहे. स्थानिकांनी अखेर आपल्या कुटुंबासह वाडा तहसिलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून कार्यालयाच्या आवारात तळ ठोकला आहे. वाडा तालुक्यातील औद्योगिकीकरण लोकांच्या जीवावर उठले असून प्रदूषणकारी कारखान्यांचा उच्छादाने जनता मेटाकुटीला आली आहे. वावेघर गावातील एका कंपनीने अनेक दिवसांपासून लोकांना वेठीस धरले असून कारखान्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. बॉयलरच्या भीतीने लोकांचे जगणे अवघड झाले असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन मात्र तारीख पे तारीख देत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अखेर येथील अनेक कुटुंबांनी वाडा तहसिलदार कार्यालयाच्या आवारात सुरक्षित स्थळी मुलाबाळांसह आपले बिऱ्हाड घेऊन शुक्रवारपासून ठिय्या मांडला आहे.



कारखान्याच्या त्रासाने मरण्यापेक्षा सरकारच्या दारात जीव गेला तर आनंद होईल अशी भावना पिडित कुटुंबांनी व्यक्त केली असून जोपर्यंत कंपनीला टाळे लागत नाही तोपर्यंत मुक्काम हलणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलकांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.

Comments
Add Comment

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

एसटी महामंडळ यात्री अ‍ॅप चालवणार

मुंबई (प्रतिनिधी) : चालकाला सन्मानजनक मोबदला व प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत

रक्षाबंधन २०२५: सूर्य-शनी युतीमुळे 'या' ५ राशींना मिळेल विशेष लाभ!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. २०२५ मध्ये रक्षाबंधनाच्या

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर