Advocates Black Coats : वकिलांना काळ्या कोटपासून ३० जूनपर्यंत सूट!

  71

पुणे : उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून राज्यभरात नागरिकांना आता उन्हाचे (Summer) चटके जाणवू लागले आहेत. सकाळी काहीसा गारवा दर दुारी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याचे समोर येत आहे. अशातच काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वकिलांना आता काळ्या कोटपासून सुट्टी (Advocates Black Coats) दिली आहे.



वकील आणि काळा कोट हे समीकरण ठरलेलचं आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करणे वकील वर्गाला जवळपास अशक्य होते. काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. त्या अनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली असून, येत्या तीस जूनपर्यंत न्यायालयाने कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.


न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही उन्हाळ्यात काळ्या कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी यंदा १ मार्च ते ३० जून हे तीन महिने कोट न वापरण्याची मुभा दिली आहे.


पुरुष वकिलांसाठी ड्रेस कोड


पांढरा शर्ट, काळी किंवा राखाडी रंगाची पँट, काळा टाय किंवा पांढरा बँड असा पेहराव असणार आहे.


महिला वकिलांसाठी ड्रेस कोड


पांढरी किंवा सौम्य रंगाची साडी, सलवार कुर्ता अथवा काळी पँट, पांढऱ्या शर्टवर पांढरा पँट असा पेहराव असणार आहे.

Comments
Add Comment

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक

मुंबईत ४ सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत!

आंदोलनासाठी एक दिवसाच्या मुदतवाढीनंतर जरांगेची प्रतिक्रिया मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil )

Ajit Pawar Onion Issue: अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, 'कांदा' प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

अहिल्यानगर: आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री