Monday, October 20, 2025
Happy Diwali

नोकरदारांची मजा, मार्च महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या

नोकरदारांची मजा, मार्च महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या

मुंबई: नवीन वर्ष सुरू होऊन मार्च महिना उजाडला आहे. मार्च महिना म्हटला की वेध लागतात होळी पाठोपाठ मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याचे. सण, उत्सवांसह तो नोकरदारांसाठी प्रत्येकी पाच शनिवार, रविवारसह होळी, गुढीपाडवा व रमजान ईदच्या सुट्यांची पर्वणी घेऊन आला आहे. ३१ दिवसांच्या महिन्यात नोकरदारांना १२ सुट्या उपभोगता येणार आहेत.

मार्चमध्ये जोडून सुट्या येत आहेत. त्यात १ व २ मार्चला पहिला शनिवार व रविवार आला आहे. ८ व ९ मार्चला दुसरा वीक एंड, १४ मार्चला धुलिवंदन, त्यानंतर १५ व १६ मार्च, २२ व २३ मार्चला शनिवारी व रविवारी, २९ व ३० मार्च दुसरा विक एंड, २९ व ३० मार्च रोजी शनिवार-रविवार आहे. रविवारी गुढीपाडवा आहे, तर ३१ मार्च रोजी रमजान ईदची सुटी आहे. नोकरदारांचा या महिन्यात सुट्यांमुळे आनंदी आनंद आहे, तर होळी व रमजान ईदची सुटी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे.

गुढीपाडवा आला रविवारी

मार्च महिन्यातील अनेक सुट्ट्‌यांपैकीच एक आहे मराठी नववर्ष असलेला गुढीपाडवा. गुढीपाडवा रविवारी येत असल्याने वेगळी सुट्टी राहणार नाही. त्यामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांची देखील एक सुटी जाणार आहे.

मार्च महिन्यातील सुट्या अशा

१, ८, १५, २२ व २९ शनिवार, २, ९, १६, २३ व ३० रविवारी १४ मार्च रोजी होळी, गुढीपाडवा (३० मार्च) वलगेच दुसऱ्यादिवशी ३१ मार्च रोजी रमजान ईद आहे.

विद्यार्थी नियोजनात व्यस्त

याची सगळ्या जास्त उत्सूकता आहे ती सण, उत्सवांसह तो नोकरदारांसाठी शालेय विद्यार्थ्यांना, त्यांना त्यांचे पुढील नियोजन करत परिवारांसोबत जाण्यासाठी धडपड चालू असते.

Comments
Add Comment