Cleanliness Drive : नारायणगाव परिसरात स्वच्छता अभियानातून काढला १४ टन कचरा!

जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे (cleanliness drive) आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाच्या आयोजन करण्यात आले होते. आपला परिसर स्वच्छ राहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता यावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.



सकाळी ८ वाजून ३० मिनिटपासून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नारायणगाव परिसरातील जुना पुणे नाशिक महामार्ग, पोलीस स्टेशन, कोल्हे मळा ते बस स्थानक, ओझर रोड ते पुनम हॉटेल रोड, नेवकर पुल, खोडद रस्ता अशा एकूण सहा हजार चौरस मीटर जागेचे तसेच २१ किलोमीटर दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता केली. यावेळी साधारणपणे तीन टन ओला कचरा व १३ टन सुका कचरा जमा करण्यात आला. ग्रामपंचायत मार्फत पुरवण्यात आलेल्या व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हा कचरा कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.


या स्वच्छता अभियानाच्याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, उपसरपंच बाबु पाटे, पोलीस उपनिरिक्षक जगदिश पाटील, नारायणगांव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, तसेच नारायणगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद