'देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल'

  132

पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.





वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राणे म्हणाले, वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा २६ टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.







कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत स्थानिकांना विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

वाढवण बंदरामुळे मोठा रोजगार निर्माण होणार आहे तो पालघर जिल्हयातील स्थानिकांना मिळायला पाहिजे. स्थानिक मच्छिमारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांची भावी पिढी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभी राहिल व आर्थिक सक्षम होइल. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण देऊन वाढवण बंदराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असून यासाठी प्रकल्प उभारणीच्या कामात संबंधित अधिकारी यांनी जलदगतीने काम करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बंदर विकास विभागामार्फत होणारी गुंतवणूक व त्याची परिस्थिती काय आहे. प्रकल्पाची कामे कुठपर्यंत आली आहेत. याचा आढावा राणे यांनी घेतला.
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई