अमरावती : अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव नाका परिसरात असलेल्या महिंद्राचा कोटक बँकेचा रोखपाल ( कॅशियर ) बँकेची तब्बल ५४ लाखाची रक्कम घेऊन पसार झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोखपालगत अनेक दिवसांपासून गैरहजर असल्याने बँकेतील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी कॅश तपासल्यानंतर ५४ लाखाची रक्कम गायब असल्याचे दिसले. याबाबत गाडगेनगर पोलिसांनी रोखपालाविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
Threat attack on CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, रूत्वीक बोंडे हा महिंद्राचा बँकेच्या शेगाव नाका शाखेत रोखपाल ( कॅशियर ) पदावर कार्यरत असून आरोपी महिला सहाय्यक रोखपाल म्हणून रूत्वीकच्या हाताखाली काम करित होती. काऊंटवरील कॅश जमा करणे, देणे आणि डयूटी झाल्यानंतर संपूर्ण कॅश स्ट्रांगरूममध्ये जमा करणे, ही संपूर्ण जबाबदारी रूत्वीक बोंडेची होती. काऊंटरमधील ड्रॉव्हर व लॉकर तसेच स्ट्रॉगरूमच्या गेटची व आतील लॉकरची चाबी देखील रूत्वीककडे असायची. रूत्वीकने महिला आरोपीसह मिळून २० जुन २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ या काळात ते नियमित डयूटीवर येत होते. १० फेब्रुवारीपासून रूत्वीक व महिला आरोपीने अचानक बँकेत येणे बंद केल्याने आणि चाब्या देखील दोन्ही आरोपींकडेच असल्याने शाखेचे प्रबंधक शैलेश कांबे यांना शंका आल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी अन्य चाबीने स्ट्रॉगरूम उघडून कॅशची तपासणी केली असता स्ट्रॉगरूमध्ये १०, २०,५०,१००, २०० व५०० अशा नोटांचे बंडल होते.
अधिकाऱ्यांनी वर्षभराच्या ऑडीट रिर्पोटनुसार कॅश तपासणी असता ५०० रूपयाच्या १० हजार ८०० नोटा म्हणजे एकूण ५४ लाखाच्या नोटा गायब दिसल्याने बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलच धक्का बसला. आता दोन्ही आरोपींनी वरील नमूद कालावधीमध्ये हळू-हळू ही कॅश गायब केली का एकाच वेळीवेळी बँकेच्या बाहेर नेली, हे अधिकाऱ्यांनाही समजले नाही. त्यानुसार शाखा प्रबंधक शैलेश कांबे यांनी याबाबत गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रूत्वीक बोंडेसह महिला आरोपीविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपासासाठी बँकेचे आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केले असून पोलिस फुटेजची कसून तपासणी करित आहेत.